BEST Strike 2019 : मुंबईमध्ये आजपासून वेतनवाढ आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचार्यांनी (BEST Strike) बेमुदत संप पुकारला आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसात हा संप आल्याने सामान्य मुंबईकर आणि चाकरमान्यांचे प्रवास करताना प्रचंड हाल होत आहे. बेस्ट बसची एकही गाडी मुंबईच्या रस्त्यांवर धावत नसल्याने इतर पर्यायी वाहतुक सेवेवर ताण आला आहे. मुंबईकरांचा त्रास थोडा कमी करण्यासाठी परिवहन वाहतुक मंडळाकडून आज मुंबईच्या रस्त्यांवर 40 ज्यादा एसटी बस (State Transport Department Bus) उतरवण्यात आल्या आहेत. Bharat Bandh, Bank Strike, BEST Strike: मुंबईकरांना 8,9 जानेवारीच्या 'भारत बंद' मध्ये कोणत्या सेवा मिळणार, कशाचा फटका बसणार?
#Mumbai: 40 extra buses being run by state transport department in the view of an indefinite strike by BEST(Brihanmumbai Electricity Supply&Transport) over demands of implementation of the merger of the BEST budget with principal budget of the BMC, employee service residences etc
— ANI (@ANI) January 8, 2019
पर्यायी वाहतूक सेवेवर ताण
बेस्ट बस सेवा ठप्प असल्याने मुंबई लोकल, मेट्रो या पर्यायी सेवेचा वापर करण्याकडे प्रवाशांचा भर आहे. घाटकोपर मेट्रो स्टेशनमध्येही खचाखच गर्दी आहे. अनेक मुंबईकरांनी रिक्षा, टॅक्सीने प्रवास करण्याचा पर्याय निवडला मात्र रिक्षाचालकांचा मुजोरपणा आणि अधिक भाडं आकारत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.मुंबईमध्ये बेस्ट बससेवा संपावर असली तरीही NMMT च्या मुंबईत धावणार्या बससेवा सुरळीत आहेत.
बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकार आज 11 वाजता बंदच्या पार्श्वभूमीवर एक खास बैठक घेणार आहेत. यामध्ये तोडगा निघाल्यास मुंबईकरांची सुटका होणार आहे. मात्र शासनाने बंदच्या दरम्यान बेस्ट कर्मचार्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे.