BEST Bus (Photo credits: PTI)

BEST e-Ticket: बेस्टकडून नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या त्यांच्या BEST Chalo App च्या माध्यमातून अवघ्या आठडाभरात 1 लाखांहून अधिक नागरिकांनी ई-तिकिट काढल्याची माहिती जनरल मॅनेजेर लोकेश चंद्रा यांनी दिली आहे. तर कागदी तिकिटापेक्षा ई-तिकिटामुळे 2 कोटी रुपयांची बचत होईल. जे कागदी तिकिटासाठी खर्च केले जातात.(Maharashtra School Update: महाराष्ट्रात वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्याची शक्यता)

नव्या उपक्रमात नागरिकांना ई-तिकिट काढल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक नाही. त्यामुळे नागरिकांना अगदी सहज अॅपच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर किंवा मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून तिकिट काढता येईल. नागरिकांना फक्त त्यांनी काढलेले तिकिट कंडक्टरला दाखवून ते वैध आहे की नाही ते तपासून घ्यावे लागणार आहे. यामुळे तिकिटासाठी लागणारा कागदी रोलची सुद्धा बचत होणार आहे. हा उपक्रम इको-फ्रेंडली स्वरुपाचा असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे. जवळजवळ 1200 प्रवाशांनी गेल्या एका आठवडाभरात डिजिटल पद्धतीने बसचा पास काढला आहे. त्यामुळे दररोज डिजिटल तिकिटांची विक्री 1 हजार झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु पुढील वर्षात हा अधिक वाढेल अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बेस्टकडून मंगळवारी PIN ची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन दिली गेली आहे. त्याचसोबत क्यूआर कोड हे ई-तिकिटांसाठी दिले गेले असून जेणेकरुन ते वैध आहे का ते कंटक्टरला तपासून पाहता येईल. यामधील युनिक फिचर म्हणजे बससाठी कलर कोड दिला गेला आहे. अॅपमध्ये नागरिकांना बस किती वाजता येण्याची शक्यता आहे ती वेळ आणि कलर कोड दिसून येणार आहे. हिरवा रंग हा बसच्या सीट उपलब्ध असल्याचे दाखवेल. तर Amber म्हणजे फक्त उभे राहण्याची सुविधा आणि लाल रंग हा बस पूर्णपणे भरल्याचे दर्शवेल.