सरकारची घोषणा, चर्चा, सत्तांतर, विलंब, टीका इत्यादी सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर अखेर शिवस्मारकाच्या बांधकामाला मुहूर्त मिळाला. आज (बुधवार, २४ ऑक्टोंबर) दुपारी ३ वाजता शिवस्मारकाच्या उभारणीसाठी पायाभरणीची सुरुवात केली जाईल. अवघ्या महाराष्ट्राला स्वप्नवत असलेल्या शिवस्मारकाच्या कामास अखेर प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. त्याबाबत राज्य तसेच देश विदेशातील तमाम शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. लार्सेन आणि टुब्रो अर्थातच एल अॅण्ड टी कंपनी हे स्मारक उभारत आहे. सुरुवात केल्यापासून ३६ महिन्यांत (३ वर्षे) स्मारक पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजप युती सरकारच्या आगोदर सत्तेत असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने शिवस्मारकाची संकल्पना मांडत घोषणाही केली. मात्र, स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकीय प्रवासात रखडला. दरम्यान, युती सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या मिळवत स्मारकाचे जलपूजन झाले. जलपूजनाचा कार्यक्रमही शिवसेना आणि भाजप यांच्यातील श्रेयवादातून घडलेल्या मानापमान न्याट्यामुळे चर्चिला गेला. दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये २ वर्षे गेली. त्यामुळे शिवस्मारकाचा प्रकल्प किती काळ रखडणार असा सवाल उपस्थित केला जात होता.(हेही वाचा, जमत नसेल तर, तसं सांगा! राम मंदिर आम्ही उभारु; उद्धव ठाकरेंचा घणाघात, अयोध्या दौऱ्याचीही केली घोषणा)
शिवस्मारक आर्थिक/भौगोलिक माहिती
- अरबी सुमद्रातील १५ हेक्टर खडकारवर स्मारकाची उभारणी होणार.
- जगात समुद्रातील सर्वात उंच स्मारक असा स्मारकाचा लौकीक.
- स्मारक उभारणीच्या पहिल्या टप्प्याचा खर्च अंदाजे अडीच हजार रुपये. (राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार)
- स्मारक उभारणीचे कंत्राट निविदा मागवून देण्यात आले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर , अॅपकॉन
- इन्फ्रास्ट्रक्चर आणि एल अॅन्ड टी या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला.
- स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३ हजार ८२६ रुपयांची निविदा देण्यात आली. (राज्य सरकारची माहिती)
शिवस्मारकातील संभाव्य गोष्टी
- शिवरायांचा अश्वरुढ पुतळा हे प्रमुख आकर्षण. शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत.
- मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ला प्रवेशद्वार प्रतिकृती, शिवरायांचे जीवनपट उलघडून दाखवणारे थिएटर, प्राणीसंग्रहालय, वस्तूसंग्रहालय
- शिवस्मारक पाहण्यासाठी १८० मीटर उंचीची लिफ्ट
- स्मारकाची उंची - ३०९ फूट समुद्रातील ३ एकर जागेवर भराव घालून चुबुतऱ्याची उभारणी. त्यावर स्मारकाची उभारणी.
शिवस्मारक स्थळ
मरीन ड्राईव्ह (मुंबई) जवळील अरबी समुद्रातील १६ एकर जमीन