'अच्छे दिन'चा नारा देत सत्तेत आले आणि आता ती केवळ निवडणुकीपूरती 'जुमलेबाजी' होती असे सांगतात, हा निर्लज्जपणा आहे. केवळ हिंदुत्त्वासाठी शिवेसाना सत्तेत आहे. सरकारला जमत नसेल तर, सरकारने तसं जाहीर करावे. आयोध्येत राम मंदिर आम्ही उभारु अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. आयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आपण येत्या २५ नोव्हेंबरला आयोध्याला जाणार असल्याचेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील शिवसेनेच्या पारंपरीक दसरा मेळाव्यात उद्धव बोलत होते. या वेळी अत्यंत संयत परंतू धारधार शब्दांत उद्धव यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा शनी आणि मंगळ असा अप्रत्यक्ष उल्लेख करत जोरदार टोला लगावला. मात्र, त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकदाही घेतले नाही किंवा त्यांच्यावर टीकाही केली नाही. दरम्यान, आपल्या भाषणात ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याबाबत थेट उल्लेख टाळला. मात्र, केवळ हिंदुत्त्वासाठी आम्ही सत्तेत आहोत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. लोक आम्हाला विचारतात तुम्ही सत्तेत का? सत्तेत आहात तर, मग सरकारवर टीका का करता? पण, विरोधी पक्ष दुबळा असेल आणि सरकारमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर, आम्ही गप्प का बसायचे. जनतेच्या प्रश्नावर शिवसेना आवाज उठवणार आणि संघर्ष करणारच, असे उद्धव यांनी या वेळी ठणकावून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान
मोदी जगभर फिरत असतात. भुगोलाच्या पुस्तकातही न कळलेल्या देशांची नावे मोदींमुळे आम्हाला कळली. गेल्या साडेचार वर्षात मोदी जगभर फिरले, पण ते आयोध्येकडे एकदाही फिरकले नाहीत, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष करताना रावनाचे दहन दरवर्षीच होते. मात्र, तरीही महागाईचा रावण पुन्हा उभा असतोच. मग, जाळायचे काय, असा सवालही ठाकरे यांनी विचारला. (हेही वाचा, भारत निश्चितच विश्वगुरु होईल- मोहन भागवत)
ShivSena https://t.co/bO6zI4IZoC
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 18, 2018
ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..
'मंदिर वही बनाएंगे’ असा नारा दिला जातो, मात्र ‘तारीख नही बताएंगे,’ - भाजपला लगावला टोला
''भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न कारणीभूत आहेत. मग ते भाजपला आता सत्तेतून बाहेर का काढत नाहीत, असा प्रश्न त्यांनाही कुणी का विचारीत नाही?''
''राम मंदिराच्या उभारणीचा विषय काढल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे ठाकरे यांनी अभिनंदन''''
काश्मीरला संपूर्ण देशापेक्षा वेगळी आणि विशेष वागणूक देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करण्यासाठी लोकसभेत ठराव आणावा''