बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख () यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. राज्य विधिमंडळातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर बीड येथे आज (28 डिसेंबर) एक सर्वपक्षीय मोर्चा (Beed Morcha) काढण्यात आला. ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्थ प्रतिसाद मिळाला आहे. हा मार्चा इतका विराट (Virat Morcha) होता की, त्याची जिल्ह्यातील ऐतिहासिक म्हणून नोंद घेण्यात आली. दरम्यान, या मोर्चामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार बॅकफुटला तर गेलेच आहे. पण, मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय, त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांनाही अटक करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला आहे.
'धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या'
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यावे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. या प्रकरणातील केवळ हल्लेखोरच नव्हे तर त्यांमागचे म्होरके आणि मुख्य सूत्रधारही शोधण्यात यावेत. या प्रकरणात सातत्याने उल्लेख होत असलेले वाल्मिक कराड यांना अटक करण्यात यावी. याशिवाय, कराड ज्यांच्या जवळचे आहे ते धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा. इतकेच नव्हे तर त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देऊ नये, अशी मागणी सामूहिकरित्या जोरकसपणे व्यक्त करण्यात आली. (हेही वाचा, Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार)
सर्वपक्षीय नेत्यांची मोर्चास हजेरी
संतोष देषमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चास सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी राजकीय पक्ष आणि जातपात, धर्म यांच्या भींती पाडून नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. राजकीय नेत्यांमध्ये संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटकर आणि दीपक केदार यांचा समावेश होता. ज्यांनी या मोर्चाला संबोधित केले. याच वेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित होते. (हेही वाचा - Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आतापर्यंत काय घडले? देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?)
'माझे वडील कधीच दिसणार नाहीत'
संतोष देशमुख यांच्या कन्येने या मर्चात केलेल्या भाषणाने सर्वांचीच मने हेलावून गेली. आपण सूर्य उगावताना पहाल, चंद्रही दुसऱ्या दिवशी उगावताना पाहाल. पण, माझे गेलेले वडील मी केव्हाही पाहू शकत नाही. माझे वडील मला केव्हाच दिसणार नाहीत. आमच्या कुटुंबावर कोसळलेले संकट आम्ही कसे दूर करावे? असा सवाल उपस्थित करतानाच या कन्येने मोर्चामध्ये उपस्थित नागरिकांचे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.