Beed Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! पैश्याच्या वादावरून सैनिक भावाची केली हत्या; बीड शहर हादरलं
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Beed Crime: बीड जिल्हातील (Beed) आष्टी येथील धक्कादायक घटनेमुळे शहर पुन्हा हादरलं आहे. पैशाच्या वादातून एका भावाने सैनिक असलेल्या मोठ्या भावाचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पैश्यावरून लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण विनायक पवार असं हत्या झालेल्या जवानाचे नाव होते. मृत तरुण हा सीआरपीएमध्ये कामाला होता. (हेही वाचा- जमिनीचा वाद पेटला, पाच मामांनी घेतला भाच्याचा जीव; बीड मधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद विनायक पवार असं आरोपी भावाचे नाव आहे. प्रवीण गेल्या पंधरा दिवसांपासून सुट्टीच्या निमित्ताने घरी आला होता. प्रवीण हा झारखंड हा येथे सीआरपीएफमध्ये जवान आहे. प्रवीण आणि विनोद यांच्यात पैशावरून वाद झाला. हा वाद पेटला आणि विनोदने प्रवीणला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनोद गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला नगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती परिसरात कळताच मोठी खळभळ उडाली. या प्रकरणी आंभोरी पोलिसांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने दवाखान्यात येत पंचनामा केला. प्रवीण यांची पत्नी सीमा पवार यांनी या प्रकरणी पोलिसांना फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी प्रवीणच्या आई झुंबरबाई पवार, वडिल विनायक पवार, सोनाली पवार आणि मुख्य आरोपी विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विनोदला तात्काळ अटक केले.