बीड: शाळेच्या परिसरात दारु बाटल्यांसह कंडोमचा ढिगभर कचरा, नागरिकांकडून संताप व्यक्त
प्रतिकात्म फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बीड (Beed) जिल्ह्यात असणाऱ्या एका शाळेच्या परिसरात दारु बाटल्यांसह कंडोमचा ढिगभर कचरा आढळून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दारुड्यांनी किंवा उनाड मुलांनी हा उपद्रव केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची तपासणी करण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

अंबाजोगाई येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींची शाळा आहे. या शाळेच्या परिसरात दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा ढिगभर कचरा साफ करण्यात आला आहे. तसेच शाळेला एक सुरक्षा भिंत असून त्याची उंची कमी असल्याने काहींनी बाटल्या आणि कंडोम तेथे फेकल्याचे काही जणांकडून बोलले जात आहे. परंतु शाळेच्या परिसरात असा प्रकार घडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.(तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आयआयटीच्या विद्यार्थ्याला अटक)

तर शाळेच्या जवळच एक मंडई आहे. तेथे सकाळच्या वेळेस गर्दी असते. परंतु रात्रीच्या वेळेस या ठिकाणी कोणीही फिरकत नाही. त्यामुळेच हा प्रकार दारुड्या किंवा उनाड मुलांकडून केला जात असल्याचे म्हटले जात आहे.