सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या पवई (Powai) येथील आयआयटीच्या (IIT) विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तर विद्यार्थी हा आयआयटीमध्ये संशोधकाचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी सुद्धा तरुणाने अन्य तरुणींना अशा प्रकारे छेडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विजय देशमुख असे तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथे राहणारा आहे. तर पीडित तरुणी ही राजस्थान येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारी आहे. विजय याने प्रथम तरुणीला फेसबुकवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र तरुणीने ओळत नसल्याने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली नाही. त्यानंतर एका वर्षानंतर पुन्हा एकदा तरुणाने त्याच तरुणीला एक प्रेम कविता पाठल्याने तिने त्याला फेसबुकवर ब्लॉक केले. तसेच तरुणीने त्याच्यासोबत असे करुनही त्याने आपले उद्योग सुरु ठेवत तिला विविध प्रोफाइलच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केली.
(वर्धा: चोरीच्या संशयावरून लहानग्याचे कपडे काढून तापत्या लादीवर बसवले, पार्श्वभागाला गंभीर दुखापत)
एवढेच नाही तरुणाने तिचा आणि त्याचा फोटो एकत्र फोटोशॉप करुन सोशल मीडियावरील प्रोफाइला लावल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आरोपी विद्यार्थ्याला सातारा येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.