वर्धा: चोरीच्या संशयावरून लहानग्याचे कपडे काढून तापत्या लादीवर बसवले, पार्श्वभागाला गंभीर दुखापत

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका आठ वर्षाच्या मुलाला चोरीच्या संशयावरून भरदुपारी तापत्या लादीवर विवस्त्र बसायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे पीडित दलित बालकाच्या पार्श्वभागाला गंभीर जखम झाली आहे, पोलिसांच्या मते हा प्रसंग जातीय वादावरून घडल्याचा संशय आहे.

वर्धा: चोरीच्या संशयावरून लहानग्याचे कपडे काढून तापत्या लादीवर बसवले, पार्श्वभागाला गंभीर दुखापत
Image For Representation Only (Photo Credits: Pixabay)

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी येथे एका आठ वर्षाच्या मुलाला चोरीच्या संशयावरून भरदुपारी तापत्या लादीवर विवस्त्र बसायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आर्वी गावातील जोगनमाता मंदिर परिसरात आठ वर्षीय आर्यन खडसे (Aryan Khadse) हा दुपारी खेळत होता, याच वेळी अमोल ढोरे (Amol Dhore) उर्फ उमेश या तरुणाने त्याला मंदिरातील पैसे चोरल्याचा संशयावरून मारहाण करायला सुरवात केली, इतकेच नव्हे तर या मुलाचे कपडे काढून भर दुपारी तापलेल्या मंदिराच्या लादीवर बसायला लावले, यामुळे पीडित मुलाच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे. या मुलाच्या वडिलांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली यानंतर पोलिसांनी आरोपी उमेश याला अटक केली आहे.

ANI ट्विट

याप्रकरणी सध्या पोलीस अमोल ढोरे याची कसून चौकशी करत आहेत, प्राथमिक माहितीनीसार पीडित मुलगा आर्यन हा दलित जातीतील असल्याने त्याने मंदिरात प्रवेश करण्यावर आरोपी अमोल याला आक्षेप होता, हा राग काढण्यासाठी त्याने मुलाला मारहाण करून त्याच्यावर चोरीचा आळ घेतला. अमोल याने केलेल्या अत्याचारानंतर आर्यन रडत घरी गेला, तेव्हा त्याच्या पार्श्वभागाला दुखापत झाल्याचे बघून त्याच्या आईला धक्का बसला, नंतर त्यांनी आर्यनच्या वडिलांना सांगून आर्यनला सरकारी रुग्णायालात उपचारासाठी दाखल केले. लज्जास्पद! नागपूर मध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून शेजाऱ्याने केला 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

 

दरम्यान आरोपी अमोल ढोरे याच्यावर दलित मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. पोलीस मुख्य निरीक्षक परमेश्वर आगाशे यांच्या माहितीनुसार या मंदिर परिसरात अनेक लहान मुले खेळत असतात याआधी असा प्रकार कधीही घडला नव्हता,शिवाय प्रसंग घडतेवेळी मंदिरातील दानपेटीला असलेले कुलूप तसेच्या तसे होते त्यामुळे या प्रकारामागे मुख्य कारण चोरीचा संशय आहे कि आणखीनच काही याबाबत सध्या तपास सुरु आहे

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2019 11:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).