पुण्यामध्ये कोयत्याची गॅंग ची दहशत रस्त्यांवर आसताना आता ती थेट कॉलेज मध्येही पोहचली आहे. बारामती मध्ये तुळजाराम चतुरचंद कॉलेज (Tuljaram Chaturchand College) मध्ये 12वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा खून झाला आहे. दिवसाढवळ्या हा खून झाला आहे. हा मृत मुलगा मूळचा सोलापूरच्या करमाळा मधील आहे. या खूनातील आरोपी अल्पवयीन आहेत. त्यातील एक जण फरार आहे. महिनाभरापूर्वी बाईकला 'कट' मारल्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
महिनाभरापूर्वी दुचाकीला 'कट' मारण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात पार्किंग मध्ये वाद झाला होता. कोणीही मध्यस्थी केली नाही. हा खून दिवसाढवळ्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्दळ असताना कुणीच मदतीला न आल्याने आता सुरक्षेबाबतही प्रश्न ठाकले आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत X वर पोस्ट करत ही घटना 'अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी' असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Baramati Crime: विजबील अधिक आल्याच्या रागातून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या .
सुप्रिया सुळे यांची x वर पोस्ट
बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो आणि खून करतो…
— Supriya Sule (@supriya_sule) September 30, 2024
बारामतीच्या टीसी कॉलेज मध्ये या खूनप्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलगा आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा फरार आहे. दरम्यान आज सकाळी 11.30 च्या सुमारास कॉलेजमध्ये कोयत्याने वार झाल्यानंतर त्याला सिल्वर ज्युबली हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.