Mumbai: बॅडमिंटन प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या स्तनास प्रशिक्षण अथवा शिक्षेच्या नावाखाली चुकीचा स्पर्श करणाऱ्या आणि तिच्या नितंबावर चापटी मारणाऱ्या अंबटशौकीन प्रशिक्षकास पोक्सो न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. मुलुंडमध्ये प्रशिक्षण सत्रादरम्यान 26 वर्षीय बॅडमिंटन प्रशिक्षकाने (Badminton Coach) अल्पवयीन मुलीच्या स्तनाला चिमटा काढल्याने POCSO न्यायालयाने आरोपीला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो न्यायालयच्या (POCSO Court) न्यायाधीश कल्पना के पाटील यांनी सांगितलं की, प्रशिक्षणादरम्यान अपघाती स्पर्श होणं समजू शकतो. परंतु, त्या प्रक्रियेत स्तनावर चिमटा काढता येत नाही.
प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण 10 जुलै 2019 रोजी घडले. पीडित मुलीने मुलुंडमधील एका मनोरंजन क्लबमध्ये बॅडमिंटन क्लास लावले होते. प्रशिक्षणादरम्यान, प्रशिक्षकाने मुलीच्या स्तनांना चिमचा काढला. मुलीने वर्ग संपल्यानंतर तिच्या पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबाने क्लबमध्ये धाव घेतली आणि या घटनेची चौकशी केली. मात्र, प्रशिक्षकाने घडलेल्या प्रकारास नकार दिला. (हेही वाचा - HC- Termination On Pregnancy after Husbands Death: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; पतीच्या मृत्यूनंतर महिलेला दिली गर्भधारणा समाप्त करण्याची परवानगी)
दरम्यान, मुलीने संपूर्ण घटना न्यायालयासमोर सांगितली आणि दावा केला की, प्रशिक्षकाने तिच्या स्तनांना दोनदा चिमटा घेतला. तसेच तिच्या नितंबावर चापट मारली. तथापी, प्रशिक्षकाने दावा केला की, मुलगी सूचना देऊनही चुका करत होती. तसेच पीडितेने संदर्भित केलेला स्पर्श हा कोचिंग आणि शिक्षेचा भाग होता. (हेही वाचा - Supreme Court On Girls Control Sexual Urges: तरुण मुलींना लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देणारे परिच्छेद "समस्याप्रधान"- सुप्रिम कोर्ट)
न्यायालयाने पीडितेच्या बाजूने दिला निर्णय -
कोर्टाने प्रशिक्षकाने केलेला दावा नाकारला आणि सांगितले की, 'जर मुलीला प्रशिक्षकाच्या जवळ येऊन शिकवण्याच्या पद्धतीमुळे आणि चुकीची शिक्षा म्हणून त्या प्रक्रियेत चुकून स्पर्श झाल्यामुळे विचित्र वाटत असेल तर तिने सुरुवातीच्या काही दिवसांत तक्रार केली असती. घटनेच्या दिवशी, शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान, तिला आरोपीने जाणूनबुजून केलेला स्पर्श जाणवला. त्यामुळे तिने याबाबत तक्रार केली. 10 वर्षांच्या मुलीच्या नितंबावर चिमटा काढणे आणि चापट मारणे ही नक्कीच शिक्षेची पद्धत नाही.'
न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, 'आरोपीच्या म्हणण्यानुसार, स्पर्श करणे, चिमटा काढणे आणि चापट मारणे हे त्याचे प्रशिक्षण आणि पीडित मुलीने चुका करत असताना तिला शिक्षा देण्याचा भाग होता. घटनेच्या वेळी पीडितेचे वय 10 वर्षे होते. ती तारुण्य गाठण्याच्या मार्गावर होती. त्या टप्प्यावर, स्तन आणि नितंब हे मुलीच्या शरीराचे भाग असतात, जे सर्वात संवेदनशील असतात. अशा भागांना चापट मारून किंवा चिमटा काढून प्रशिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा करणे अपेक्षित नाही. हे कृत्य अपघाती किंवा हेतुपुरस्सर असे म्हणता येणार नाही.'