Pune Crime: पुण्यातून(Pune) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करुन तीच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीला विविध ठिकाणी नेत तीच्यावर बलात्कार केला. पीडितेने या आरोपी विरोधांत लष्कर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपीचा तपास घेत त्याला बेड्या घातल्या आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तबरेद शेख असं या आरोपीचे नाव आहे. ही घटना पनवेल आणि बाणेर येथे ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान घडली आहे. पीडीत तरुणी आणि आरोपी तबरेज हे दोघेही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आरोपीने पीडीत तरुणीला फसवूण पुणे स्टेशन येथे नेले. त्यानंतर तीचे अपहरण केले. पनवेल येथे आणत तीला लॉजवर घेवून गेला. तीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. पुन्हा त्याने पीडितेला बाणेर येथील लॉजवर आणून बलात्कार केला.
पीडित तरुणीने आरोपी विरुध्दात गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तबरेजचा तपास करत त्याला अटक केले. दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढतांना दिसत आहे. पुण्यात महिलांवरील वाढत्या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.