
औरंगाबाद (Aurangabad) येथे एका विवाहित महिलेने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून प्रियकरासोबत पळ काढण्याची तयारी केली. मात्र या प्रकारात महिलेने क्रुर कृत्य केले आहे. त्यामध्ये बायकोने कोणाला तिच्यावर संशय येऊ नये म्हणून तिने चक्क वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, बायकोने नवऱ्याच्या त्रासापासून वाचून प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विचारपूर्वक कट रचला. या कटामध्ये एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला सामील करत तिची हत्या केली. त्यानंतर तिला पेटवून देण्यात आले. कारण जळालेली महिला आपण असल्याचे तिला इतरांना भासवून द्यायचे असल्याने तिने हे गैर कृत्य केले आहे.
(पुणे: दारु पिण्यास नकार दिल्याने मेजरसह अन्य तिघांकडून जवानास मारहाण)
त्याचसोबत मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिच्या चेहरा विद्रुप करण्यात आला. या प्रकरणाची माहिती कळताच पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकाराचा शोध घेतला. तसेच या दोघांना पोलिसांनी अटक केली मात्र वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा नाहक बळी गेला आहे.