दारु पिण्यास नकार दिला म्हणून मेजर आणि अन्य तिघांनी जवानाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे. जवानाच्या तक्रारीनंतर पुण्यातील सांगवी पोलिसांनी मेजर आणि अन्य तिघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे. औंध लष्करी तळावरील एका जवानाने सोबत दारु पिण्यास नकार दिल्याने मेजर आणि अन्य तिघांनी त्याला मारहाण केली.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडल्याचा दावा जवानाने केला आहे. बेशुद्ध होईपर्यंत माराहाण केल्याचे जवानाचे म्हणणे आहे. शुद्धीवर आल्यावर ते औंध येथील रुग्णालयात होते. (पुणे: दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करत लुटले)
मेजरसह तिघेजण दारु पित असताना त्यांनी जवानाला बोलावले आणि दारु पिण्याचा आग्रह करु लागले. दारु पिण्यास नकार दिल्याने या चौघांनी जबरदस्तीने पकडून दारु पाजण्याचा प्रयत्न केला. नकार कायम राहिल्याने त्यांनी जवानाला लाथा-बुक्कांनी मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.