पुणे: दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करत लुटले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

पुणे (Pune) येथील एका रिक्षाचालकाने प्रवाशाकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. परंतु प्रवाशाने रिक्षाचालकाला दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने प्रवाशाला लुटल्याचा प्रकार घडला आहे. त्याचसोबत धारधार शस्राने प्रवाशावर हल्ला करण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, मोसिन नासिर शेख असे या प्रवाशाचे नाव आहे. पुणे रेल्वेस्थानक ते उरली कानचन येथे शेख प्रवास करत होता. त्यावेळी रिक्षाचालकाने त्याला लुटल्याचा प्रकार घडला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.(Mumbai: विक्रोळीत बकरीच्या हल्ल्याने लहानग्याचा दुर्दैवी अंत)

तर हडपसर येथे हा प्रकार घडला आहे. रिक्षाचालकाने दारुसाठी पैसे मागितल्यावर त्याला नकार देताच त्याने अन्य पाच जणांना बोलावून शेख याला मारहाण केली. तसेच पीडित शेख याच्याकडून सर्व आरोपींनी 700 रुपयांसह त्याचा मोबाईल पळवला. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.