Coronavirus (Photo Credit: Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा लाखोंच्या घरात पोहचला आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांसह बळींचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. परंतु राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान आता मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या पाठोपाठ औरंगाबाद येथे सुद्धा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आज औरंगाबाद येथे आणखी 192 कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आकडा 4 हजारांच्या पार गेला आहे.

औरंगाबाद मधील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 4491 वर जाऊन पोहचला आहे. यामध्ये 102 रुग्ण हे मनपा क्षेत्राअंतर्गत तर 91 रुग्ण हे ग्रामीण विभागातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गावाकडच्या भागांमध्ये कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. परंतु डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. (औरंगाबाद: बजाज कंपनी मध्ये 79 कर्मचार्‍‍यांना कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू झाल्याने कंंपनी 2 दिवस बंद - रिपोर्ट)

दरम्यान, महाराष्ट्रातील एकूणच कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास कोविडच्या रुग्णांचा आकडा 147741 वर पोहचला आहे. तर 6931 जणांचा बळी गेला असून 63342 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तसेच 77453 जणांचा प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आता अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार नियमात शिथिलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास सरकार कडून परवानगी देण्यात आली आहे.