Aurangabad Municipal Corporation Election 2020: महाविकासआघाडी सरकारमधली काँग्रेस स्वबळावर लढणार औरंगाबाद महापालिका निवडणूक
Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

काँग्रेस पक्ष (Congress Party) सध्या महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचा घटक आहे. असे असले तरी औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Municipal Election) स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा विचार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि काँग्रेसचे संपर्क मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ही भूमिका मांडली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते गुरुवारी बोलत होते. अमित देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष महाविकासआघाडी सरकारमध्ये सहभागी असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections 2020) हा पक्ष स्वबळावर लढणार आहे.

अमित देशमुख यांनी सांगिले की, स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढताना कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेचा सूर काय आहे हेसुद्धा विचारात घेतले जाणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष नेहमीच स्वबळावर लढत आला आहे. त्यामुळे याही वेळी तो स्वबळावरच लढणार आहे. त्यासाठी त्या दिशेने पक्षाने सुरुवातही केली आहे. कार्यकर्त्यांची भावना, जनतेचा सूर पाहून रणनितीत आवश्यक ते बदलही करण्यात येतील, असेही अमित देशमुख यांनी या वेळी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे आव्हान असल्याबाबत विचारले असता अमित देशमुख म्हणाले की, एमआयएमचे नगरसेवक निवडूण आले खरे. परंतू, गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय काम केले हे जनतेला माहिती आहे. जनतेच्या समस्या किती सोडवल्या, सर्वसामान्य जनतेच्या कामी ते किती आले लोकांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे एमआयएमच्या आव्हानाचा काँग्रेसला विचार करण्याची आवश्यकता नाही.लोक पुन्हा एमआयएमच्या खासदारांना स्वीकारणार नाहीत, असे देशमुख म्हणाले. (हेही वाचा, Ajit Pawar on Eknath Khadse: भाजप नेते एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश? अजित पवार काय म्हणाले पाहा)

दरम्यान, राज्यात सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाची पार्श्वभूमी विचारात घेता 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे का? असे विचारले असता राज्यत सरासरीपेक्षा अधिक किंवा काही ठिकाणीमुसळधार पाऊ पडला आहे. परंतू सरकार परीस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. सर्व बाजूंनी विचार करुन निर्णय घेतला जाईल असेही अमित देशमुख यांनी यां वेळी सांगितले.