Aurangabad MP Imtiaz Jaleel (Photo Credit: ANI)

औरंगाबाद (Aurangabad) शहरात 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन (Lockdown) होणार होते. परंतु, कामगार संघटना आणि राजकीय दबावामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, औरंगाबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. यातच औरंगाबाद शहरात लॉकडाऊनच्या निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी मध्यरात्री आपल्या समर्थकांसह परिसरातील जल्लोष साजरा केला. यावेळी शेकडो लोकांच्या गर्दीत खासदार इम्तियाज जलील मास्क न घालता सामील झाले. तसेच त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पायदळी तुडवण्यात आले.

कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्यामुळे भाजपचे नेते संजय केनेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा. अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारचा निषेधही करू, असा इशारा संजय केनेकर यांनी दिला होता. अखेर इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Aurangabad: औरंगाबादमधील एका हॉटेलवर अज्ञातांकडून गोळीबार; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

एएनआयचे ट्वीट-

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी इम्तिया जलील यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात साथीचा रोग अधिनियम कलम 188, 269, आणि 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे औरंगाबादच्या सीटी पोलीस ठाण्याचे पीआय संभाजी पवार यांनी दिली आहे.