Beed Police Suicide: बीडमध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Beed Police Suicide: काही दिवसांपूर्वी सांताक्रुझ येथे एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती ही घटना ताजी असताना देखील बीडमध्ये एका सहाय्यक पोलिस निरिक्षकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. दरम्यान आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुभाष दुधाळ असं आत्महत्या करण्याऱ्या पोलिसाचे नाव आहे. ही घटना बीड येथील परळी रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. सुभाष यांच्या आत्महत्येमुळे बीड पोलिस आयुक्तलायात एकच खळबळ उडाली आहे. सुभाष यांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल का उचलले हे अद्याप समजले नाही. मध्यरात्री रेल्वे समोर येऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हेही वाचा- सॉरी पप्पा, जेईई करू शकत नाही’; कोटा येथे तरुणाची आत्महत्या, वर्षातील 6 वी घटना

रेल्वे समोर येऊन कोणीतरी आत्महत्या केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. घटनास्थळावरून मयत पोलिस अधिकाऱ्याच्या शरिराचे दोन तुकडे झालेले पाहिले. तपासणीतून पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले.या घटनेची माहिती सुभाष यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. सुभाष यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळला आहे. परळी परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.