विधानसभा निडणूक 2022 (Assembly Elections 2022) बाबत भारतीय जनता पक्ष (BJP) कामला लागला आहे. भाजपने आगामी काळात विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारींची नियुक्तीही केली आहे. भाजपने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav), गजेंद्रसिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांची अनुक्रमे गोवा (Goa), मणिपूर (Manipur) आणि पंजाब (Punjab ) राज्यांचे भाजप निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर हायहोल्टेज उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली असल्याचे समजते.
पाठीमागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश होण्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागील काही कांळांपासून केलेल्या दिल्ली वाऱ्या पाहता या चर्चांना बळकटी दिली जात होती. तसेच, देवेंद्र फडणवीस हे आता केंद्रीय राजकारणात सक्रीय होऊ शकतील असेही म्हटले जात होते. परंतू, भाजपने त्यांच्याकडे गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022)प्रभारी पद सोपविल्याने या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांचे भाष्य)
वर्षभरात निवडणुका पार पडणारी राज्ये
- उत्तर प्रदेश
- पंजाब
- उत्तराखंड
- गोवा
- मणिपूर
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये साधारणपणे मार्च-एप्रिल-मे (2022) या काळात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण बदल करुन आवश्यक ते फेरबदलही केल्याचे पाहायला मिळत आहे.
ट्विट
Maharashtra LoP Devendra Fadnavis, Union Ministers Bhupender Yadav, Gajendra Singh Shekhawat have been appointed as BJP in charge for the upcoming Assembly elections (2022) in Goa, Manipur, and Punjab respectively.
— ANI (@ANI) September 8, 2021
प्रभारी पद आल्यामुळे गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्व रणनिती आणि निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी पदाची जबाबदारी भाजपने सोपवली होती. बिहारमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे फडणवीस यांचे वजन भाजपमध्ये बऱ्यापैकी वाढले होते.