Ashok Chavan To Join BJP Today: अशोक चव्हाण यांचा आजच भाजप प्रवेश; राज्यसभा उमदवारी मिळण्याची शक्यता
Ashok Chavan | (Photo Credits: Facebook)

अशोक चव्हाण आज (13 फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan To Join BJP Today) करत आहेत. कालच त्यांनी विधानसभा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा ( Ashok Chavan Quit Congress) दिला. त्यानंतर आजपासून ते नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत आहेत. प्रसारमाध्यमांसी आज सकाळी बोलत असताना 'आज मी भाजप (BJP) प्रवेश करत आहे. माझ्या कारकीर्दीची नवी सुरुवात होत आहे', असे अशोक चव्हाण यांनी स्वत: सांगितले. त्यांनी इतर प्रश्नांवर भाष्य करण्यास नकार दिला. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशासाठी मुंबई येथील भाजप कार्यालयात लगबग सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी एक पत्रकार परिषदही घेणार असल्याचे समजते.

काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का

अशोक चव्हाण  यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्यसभा निवडणूक जाहीर झाली असताना आणि मतदानासाठी काहीच दिवस बाकी असताना महत्त्वाचा नेता पक्ष सोडून गेल्याने महाराष्ट्र काँग्रेसला हादरा बसला आहे. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र या आमदारांचा नेमका आकडा किती याबाबत मात्र निश्चित माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा, Sanjay Raut on Ashok Chavan and BJP: महात्मा गांधी यांचा विचार राबवत भाजपकडून काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण- संजय राऊत)

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया:

पृथ्वीराज चव्हाण: आमचे ज्येष्ठ सहकारी अशोक चव्हाण यांनी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. हा एक दुःखद निर्णय आहे. याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. ते हा निर्णय घेतील असे आम्हाला वाटले नव्हते. त्यांना दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री केले. यात पक्षाची काय चूक झाली, त्यांची कोणावर नाराजी होती- याबद्दल तेच सांगतील. हे अत्यंत वेदनादायी आहे. काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र आहेत. भाजपचे नेते अफवा पसरवत आहेत की काही लोक त्यांच्या संपर्कात आहोत, असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (हेही वाचा, Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर)

जयराम रमेश: भाजपचे 'वॉशिंग मशीन' खूप शक्तिशाली आहे. हे स्पष्ट आहे की आपल्या देशात विशेष वॉशिंग मशिन कार्यरत आहे. त्यामुळे अनेक लोक पक्षांतर करत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, काही लोकांच्या बाहेर पडण्याने काँग्रेस तुटेल. पक्षाच्या मोठ्या नेत्याने पार्टी सोडण्याचे दुःख आहे पण याचा पक्षावर परिणाम होणार नाही. (हेही वाचा, Ashok Chavan Quit Congress Likely to Join BJP: अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा पंजा; भाजपच्या कमळाला हात देण्याची शक्यता)

चव्हाण यांची राजकीय वाटचाल

अशोक चव्हाण यांच्या राजकीय प्रवासात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणी (CWC) मध्येही काम केले आहे. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 9 नोव्हेंबर 2010 रोजी काँग्रेस पक्षाने त्यांना आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला.