Ashish Shelar (Photo Credits-ANI)

Ashish Shelar Threat Call: भाजप नेते आशीष शेलार यांना एका अज्ञात इसमाकडून धमकीचे फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आशीष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त त्यांना फोनवरुन शिविगाळ केल्याचे ही शेलार यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आशीष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.(Suspended BJP MLA: निलंबीत भाजपा आमदारांना दिलासा मिळणार का? 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)

आशीष शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकावर फोन आले होते. हे क्रमांक त्यांनी पोलिसांकडे देत त्याची तपासणी करण्याचे आशीष शेलार यांनी म्हटले आहे. शेलार यांना हे धमकीचे फोन गेल्या दोन दिवसांपासून सतत येत असल्याचे ही कळत आहे.  यापूर्वी सुद्धा गेल्या वर्षात आशीष शेलार यांना अशाच प्रकारचे धमकीचा फोन आला होता. त्यावेळी एका व्यक्तीला मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले होते.(Amruta Fadnavis On Vidya Chavan: अमृता फडणविसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा आणि मानहानीचा दावा)

Tweet:

गेल्या महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा धमकीचे फोन आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पत्र सुद्धा महापौर बंगल्यवार आले होते. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी पोलिसात तक्रार धाव घेतली होती. तर नुकत्यात नागपूर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह अन्य ठिकाणची दहशतावादी संघटना जैश-ए-मोहम्मद कडून रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.