Ashish Shelar, Best Bus (PC - Twitter)

मुंबईतील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या दोन दिवसांपूर्वी बेस्टच्या डबल डेकर बसचे चाक खड्डयात अडकू निखळल्याची विचित्र घटना कुर्ला येथील लोकमान्य टिळक उड्डाणपुलावर घडली होती. या घटनेनंतर भाजप नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विट हँडलवरून या बसचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, 'मुंबईच्या रस्त्यावरील खड्यांमध्ये महापालिकेतील कारभाऱ्यांच्या "भ्रष्ट कार्य कर्तुत्वाची चाक" पहा कशी निखळून पडत आहेत.' मुंबईकरांनो पहाताय ना? यांचा "बेस्ट" कारभार? असा सवालदेखील आशिष शेलार यांनी मुंबईकरांना उपस्थित केला आहे. (हेही वाचा -Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत)

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे विरोधकांकडून सरकारच्या कामावर नेहमीचं प्रश्न उपस्थित केला जातो. रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी होणार, असा सवाल शेलार यांनी यापूर्वी ठाकरे सरकारला केला होता. तसेच मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर आरसा का धरीत नाही? अशा शब्दांत शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला होता.