कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे यंदा आषाढी यात्रा (Ashadhi Wari Sohala 2020) होणार का? असा प्रश्न वारकऱ्यांना पडला होता. आज या यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंदा आषाढी एकादशीसाठी पायी दिंडी जाणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या वर्षी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात येणार येणार आहेत.
आज पुण्यातील काऊन्सिल हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवलं जाणार आहे. (हेही वाचा - Locust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार)
दरम्यान, अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची, आळंदी आणि देहुहुन पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी आपल्या भूमिका मांडल्या. या संदर्भात सखोल चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.