Aryan Khan Drug Case: नवाब मलिक यांच्या आरोपांचे NCB ने खंडन; 'राष्ट्रवादीला कोर्टात जायचे असेल तर आम्ही तिथे उत्तर देऊ'- DG Gyaneshwar Singh
NCB Office (Photo Credits: Twitter)

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) केलेले आरोप, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने नाकारले आहे. एनसीबीने नवाब मलिक यांच्या आरोपांना पूर्वग्रहदूषित म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला खोट्या आरोपांमध्ये अटक झाल्याचे म्हटले आहे. आज संध्याकाळी नवाब मलिक यांची पत्रकार परिषद पार पडली, त्यामध्ये त्यांनी क्रुझवर कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ सापडले नसल्याचा दावा केला आहे.

इतकेच नव्हे तर आर्यन खान अटक प्रकरणात भाजप पदाधिकारी सामील असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी काही फोटो व व्हिडिओ माध्यमांसमोर मांडले. तसेच गेल्या एक महिन्यापासून क्राइम रिपोर्टर्सना माहिती दिली जात होती की, पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान असणार आहे, असेही ते म्हणाले.

आता एनसीबीने मलिक यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. ‘संघटनेवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत आणि असे वाटते की ते NCB ने केलेल्या आधीच्या कायदेशीर कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे सर्व आरोप द्वेष आणि संभाव्य पूर्वग्रहदुषित आहेत’, असे NCB चे उपमहानिरीक्षक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. सिंह पुढे म्हणाले, ‘आमची कार्यपद्धती व्यावसायिक आणि कायदेशीरदृष्ट्या पारदर्शक आणि निष्पक्ष राहिली आहे आणि ती तशीच पुढे राहील.’ (हेही वाचा: क्रुझवरील पार्टीत अमली पदार्थ सापडलेच नाहीत, एनसीबीचा छापा बनावट; मंत्री नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट)

ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, ‘एनसीबी मुंबईच्या टीमने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ग्रीन गेट मुंबई आणि कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला. यावेळी कोकेन, चरस, एमडीएमए सारख्या विविध ड्रग्जसह 8 जणांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. कॉर्डेलीया क्रूझ जहाजावरील एनसीबीच्या छाप्यात भाजपशी संबंधित खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा राष्ट्रवादीच्या आरोपांवर मुंबईत एनसीबीचे उपमहानिरीक्षक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, जर राष्ट्रवादीला कोर्टात जायचे असेल तर ते तेथे जाऊन न्याय मागू शकतात. आम्ही त्यांना तिथे उत्तर देऊ. या प्रकरणामध्ये आम्ही सर्वकाही कायद्यानुसार केले आहे: