Cruise ship party case (Photo Credits-ANI)

मुंबई एनसीबीने 3 ऑक्टोबरला मुंबई गोवा क्रुझ वरील ड्र्ग्स पार्टी उधळून लावत 8-10 जणांना ताब्यात घेतं होते. या ड्र्ग्स पार्टी मध्ये मेगास्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan), त्याचा बालपणीचा मित्र अरबाझ मर्चंट सह काही तरूण मंडळी एनसीबीने ताब्यात घेतली होती. काल बॉम्बे हायकोर्टात आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. आज त्याची ऑर्डर न्यायालयाने जारी केली आहे. यामध्ये आर्यन खानला आता दर शुक्रवारी मुंबईच्या एनसीबी कार्यालयामध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हजेरी लावण्याच्या सूचना आहेत. एनडीपीएस कोर्टाकडून (NDPS Court) परवानगी घेतल्याशिवाय अर्जदारांना भारत देश सोडता येणार नाही. तसेच पीआर बॉन्ड (PR Bond) म्हणून 1 लाख रूपये सादर करावे लागणार आहेत. तर पुन्हा अशा कोणत्याही गोष्टीत पुन्हा आढळू नये. असे आदेश आहेत. नक्की वाचा: Aryan Khan Arrested: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक; Drugs प्रकरणामध्ये NCB ची मोठी कारवाई .

बॉम्बे हाय कोर्टाने जामीन देताना अर्जदार आर्यन खानला त्याचा पासपोर्ट देखील Special Court मध्ये  सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच सह आरोपींसोबत संपर्क ठेवणं टाळण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. मुंबई स्पेशल कोर्टाने आर्यन खानला जामीन नाकारल्यानंतर जामीनासाठी मुंबई हाय कोर्टात दाद मागण्यात आली. 3 दिवसांच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी नंतर काल आर्यन खानचा जामीन मंजूर झाला आहे. आर्यनच्या सुटकेसाठी काल कोर्टत भारताचे माजी सॉलिसेटर जनरल मुकूल रोहतगी बाजू मांडत होते.

ANI Tweet

आज आर्यन खान तुरूंगाबाहेर पडण्याची शक्यता आहे. आर्यन खान मागील काही दिवसांपासून आर्थर रोड जेल मध्ये होता. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार,  जहाजावरील पार्टीमधून एक्स्टसी, कोकेन, एमडी आणि चरस सारखे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. आर्यनकडे मात्र ड्रग्स सापडले नव्हते.