एमडीसह अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 5 ड्रग्जमाफियांना अटक, 53 कोटींचे ड्रग्ज जप्त
Representational Image (Photo Credits: File Photo)

मेफेड्रॉन (MD) सारखे घातक ड्रग्ज (Drugs) तयार करुन मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात विकणाऱ्या ५ ड्रग्जमाफियांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला (Anti-Terrorist Squad) मिळताच त्यांच्याकडून संबधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान, तब्बल कोटींहून अधिक रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या कित्येक दिवसांपासून ड्रग्जच्या तक्रारी येत आहेत. यात मोठ्या प्रमाणात तरुण मुलांसह मुलींदेखील याला बळी पडल्याचे समोर आली आहे.

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. तरीदेखील मुंबईच्या काही भागात आमली पदार्थाची विक्री केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, नवी मुंबई येथे एका फॅक्टरीत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे रसायन वापरून एमडीसारखे आमली पदार्थ तयार केले जात असे. याच फॅक्टरीवर छापेमारी करत पोलिसांनी पनवेल (Panvel) येथील गोदामातून ५१ कोटी ६० लाख किंमतीचे १२९ किलो एमडीचा साठा आणि एमडी विकून जमा झालेली १ कोटी ४० लाखांची रक्कम जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५२ कोटी ६४ लाख ९४ हजार इतकी आहे. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून एटीएसकडून अधिक तपास केला जात आहे. हे देखील वाचा-कांदिवली येथे रिक्षात बसलेल्या महिलेसमोर अश्लील चाळे, रिक्षाचालकाला अटक

दहशतवादीविरोधी पथकाने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ भांडुप (Bhandup) पंपिंग स्टेशन परिसरात आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचत एटीएसने दोघांना ९ किलो मेफेड्रॉनसोबतच अटक केली. यात जितेंद्र परमार ऊर्फ आसिफ, नरेश मस्कर, अब्दुल रझाक, सुलेमान शेख आणि इरफार शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.