महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल महाजन च; पुणे धर्मादाय आयुक्त न्यायालयाचा निर्णय
Anil Mahajan | File Photo

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल महाजन च असल्याचं आणि त्यांच्यासह १० विश्वस्तांचा चेंज रिपोर्ट अधिकृत मंजूर करण्याचा महत्त्वाचा निर्णय पुणे धर्मादाय आयुक्त न्यायालयाने दिला आहे. अनिल महाजन, हरिश्चंद्र डोके, आर.बी.माळी, प्रवीण महाजन, अशोक भुजबळ, दीपक महाजन, शोभा रासकर, पौर्णिमा महाजन ,डॉ.विना कावलकर, अजय गायकवाड, काशिनाथ जाधव यांची विश्वस्त पदी निवड केली होती व सर्व नवनियुक्त विश्वस्त यांनी मिळून प्रदेश अध्यक्ष पदी अनिल महाजन यांची निवड केली आहे. त्याचा अधिकृत चेंज रिपोर्ट दिनांक 27 नोव्हेंबर 2018 रोजी पुणे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्याला आता अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान महासंघासाठी हरकतदारांचे कुठलेही ठोस कार्य दिसून न आल्याने पुणे धर्मादाय आयुक्त न्यायालयाच्या राहुल चव्हाण यांच्या बँचने हरकतदारांचा अर्ज फेटाळला आणि अनिल महाजन यांच्यासह एकूण विश्वस्त असलेल्या 10 जणांचा बदल अर्ज गुणवत्तेच्या आधारावर मेरिट वर मंजूर करण्यात आला. धर्मादाय आयुक्त पुणे न्यायालयाचा आदेश राहुल चव्हाण यांच्या सहीनिशी 1 एप्रिल 2021 ला रोजी पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता माळी समाजातील तरुणांनी दुकानदारी करणाऱ्यांना लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची स्थापना 1983 साली खान्देशात धुळे येथे झाली. चंद्रकांत पांढरे सर यांनी समाजाच्या हितासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाची स्थापना केली. परंतु अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचा ताबा या संस्थेवर आतापर्यंत राहिलेला होता. राज्यभरात संभ्रम निर्माण झाला होता की, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे 2 गट आहेत अशा चर्चा नेहमी होत होत्या. आता चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.