महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे खोचक ट्विट; पाहा व्हिडिओ
Anand Mahindra | | (Photo Credits-Twitter)

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय स्थितीवर खोचक टिप्पणी केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ आहा एका कबड्डी सामन्यादरम्यानचा आहे. खरेतर, महिंद्रा यांनी या आधीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडिओसोबत महिंद्रा यांनी म्हटले आहे की, “मी ट्विट केलेला हा व्हिडीओ आठवतोय? महाराष्ट्रात सध्या जे काही घडलं त्यावर भाष्य करणारा यापेक्षा चांगला व्हिडीओ असूच शकत नाही.”.

राज्यात असलेली राष्ट्रपती राजवट अचानक मागे घेण्यात आली. इतसेच नव्हे तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. प्रसारमाध्यमांवरुन ही बातमी झळकताच राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खुद्द शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षालाही या घटनेची खबर नव्हती. त्यामुळे अजित पवार यांनी उचललेलेल पाऊल राज्याच्या राजकारणात प्रचंड घडामोडी करणारे ठरत आहे. (हेही वाचा, अजित पवार यांच्यासोबत मिळून मजबूत आणि स्थिर सरकार देणार; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास)

आनंद महिंद्रा ट्विट

राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहे.