Eastern Express Highway Jammed Due To Python: 8 फुटी अजगरामुळे  पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; पहा फोटोज
Eastern Express Highway Jammed Due To Python (PC - ANI)

Eastern Express Highway Jammed Due To Python: आज मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर (Eastern Express Highway) एका 8 फूट अजगरामुळे (Python) सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली. सोमय्या मैदानातून आठ फूट लांबीचा अजगर पूर्व द्रुतगती महामार्गावर आला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारच्या चाकात जाऊन बसला. त्यामुळे कार चालकाने गाडी जाग्यावर उभी केली. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक कप्तान मलिक यांनी या घटनेची माहिती महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सर्पमित्रांना दिली. त्यानंतर सर्पमित्र अभिरुप कदम, सिद्धार्थ गायकवाड आणि सुनील कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अजगराला कारखालून सुरक्षित बाहेर काढलं. (हेही वाचा - Rare Blue Snake Viral Video: लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलावर निळ्या रंगाच्या दुर्मिळ सापाचा व्हिडिओ व्हायरल; जगातील सर्वात सुंदर साप असल्याचा नेटीझन्सचा दावा)

कारमध्ये अडकलेल्या अजगराला पाहण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या या घटनेचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा अजगर सोमय्या मैदानातून रस्त्यावर आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.