Rare Blue Snake Viral Video: आतापर्यंत तुम्ही सापाच्या विविध प्रजाती पाहिल्या असतील. मात्र, तुम्ही कधी निळ्या रंगाचा साप पाहिला आहे का? हो निळ्या रंगाचा साप. सध्या सोशल मीडियावर एका निळ्या रंगाच्या सापाचा (Rare Blue Snake) व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा साप लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलावर दिसून आला (Blue Snake Sitting on Red Rose) आहे. हे दृश्य सर्वांचेच मन आकर्षित करून घेत आहे.
सोशल मीडियावर निळ्या सापाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यापूर्वी कधीही निळ्या रंगाचा साप पाहिला नसल्याचं अनेक युजर्संनी म्हटलं आहे. तसेच निळ्या रंगाचा साप हा जगातील सर्वात सुंदर साप (World's Most Beautiful Snake) असल्याचा दावादेखील काही नेटीझन्सनी केला आहे. (हेही वाचा -Ice Cream Pav Video: मुंंबईच्या वडापाव ला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव? 'हा' व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले)
The incredibly beautiful Blue Pit Viper pic.twitter.com/zBSIs0cs2t
— Life on Earth (@planetpng) September 17, 2020
दरम्यान, या सापाचं नाव ब्लू पिट व्हाइपर, असं आहे. मात्र, तो एक भयंकर साप आहे. या सापाच्या दंशामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. हा साप इंडोनेशिया आणि पूर्व तिमोरमध्ये भागात आढळून येतो. हा साप अतिशय दुर्मिळ आहे.
'लाइफ ऑन अर्थ' या ट्विटर अकाऊंटवर या ब्लू पिट व्हाइपरचा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक युजर्संनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून काहींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हा जगातील सर्वात सुंदर साप असल्याचा दावा करण्यात येत आहे.