Amruta Fadnavis | (Photo Credits: Facebook)

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाचे (Maharashtra MLC Election 2020 Results) बिगुल वाजताच सारं चित्रच पालटून गेले. यात भाजपची पिछेहाट करत महाविकासआघाडीने जबरदस्त आघाडी घेतली. या निवडणूकीत भाजपला धुळे-नंदुरबार वगळता अन्य जागांवर विजय मिळवता आला नाही. या धक्कादायक पराभवानंतर भाजपने आत्मचिंतन करायला सुरुवात केली आहे. या पराभवानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूकीतील या धक्कादायक पराभवानंतर अमृता फडणवीस यांनी 'सध्या सुरूवात वाईट झाली आहे. पण या वाईट सुरूवातीचा शेवट हा नक्कीच चांगला आणि सकारात्मक होईल' अशा आशयाचे ट्विट केले आहे. यासोबतच अमृता फडणवीस यांनी जय महाराष्ट्र असा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

हेदेखील वाचा- Maharashtra MLC Election 2020 Results: शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याबद्दल त्यांनी विचार करावा, रावसाहेब दानवे यांची निवडणूकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही अशा शब्दांत शिवसेनेवर टिका केली आहे.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने हे स्वाभाविकच होते" असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच माझे नेहमीच त्यांना एकटे लढून दाखवण्याचे आव्हान राहिले आहे. मात्र ते एकटे लढणार नाही, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही असेही ते मिडियाशी बोलताना म्हणाले.