अमृता फडणवीस (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस( Amruta Fadnavis) सोशल मीडियात नेहमीच सक्रिय असतात. प्रत्येक मुद्द्यांवरील गोष्टींबाबत अमृता फडणवीस आपले मत व्यक्त करताना दिसून येतात. परंतु काही वेळेस त्यांनी मांडलेल्या मतांवरुन खिल्ली सुद्धा उडवली जाते. अशाच पद्धतीचा एक किस्सा आता पुन्हा घडला आहे. अमृता फडवणीस या वेबिनारच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी बाजूला असलेल्या एका पेपरवर असे काही लिहिले होते ज्यामुळे अमृता फडवणीस आता सोशल मीडियात पुन्हा ट्रोल झाल्या आहेत.

अमृता फडवणीस कम्युनिटी हेल्थ सर्विस 2019-20 नुसारच्या वर्कशॉप वेळी वेबिनारच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांच्या बाजूला काही पेपर्स होते. त्यामधीलच एका पेपरवर 'फोटो लेते रहो' असे लिहिले आहे. याच कारणास्तव आता त्या ट्रोल झाल्या असून युजर्सकडून या फोटोसाठी विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.(भविष्यात राजकारणात येणार का? पत्रकारांनी विचारलेल्या पश्नाला अमृता फडणवीस यांचे उत्तर; राजकीय नव्हेतर 'अशा' पद्धतीने लोकसेवा करण्याची इच्छा केली व्यक्त)

तर काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यामध्ये अमृता फडणवीस यांनी घरापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावणा-या कोरोना वॉरियर्ससाठी एक सुंदर गाणे गाऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या गाण्याचे बोल आहेत 'मंदिर तू, तू ही शिवाला'. नुकतेच हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलेहोते. त्याचसोबत लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी गरजूंना मदत केल्याचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.