भविष्यात राजकारणात येणार का? पत्रकारांनी विचारलेल्या पश्नाला अमृता फडणवीस यांचे उत्तर; राजकीय नव्हेतर 'अशा' पद्धतीने लोकसेवा करण्याची इच्छा केली व्यक्त
Amruta Fadnavis Teri Ban Jaungoi Song (Photo Credits: YouTube)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची नुकतीच खासगी वृत्त वाहिन्यांना मुलाखत दिली. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी राजकारण, सोशल मिडिया, पगार, दिल्ली बलात्कार प्रकरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. दरम्यान, भविष्यात राजकारणात येणार का? असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला अमृता फडणवीस यांनी दिलेले उत्तर ऐकून त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी त्यांनी लोकसेवा करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, राजकीय पद्धतीने नव्हेतर, गाण्याच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची त्यानी इच्छा दर्शवली. अमृता फडणवीस या राजकारणात सक्रीय नसल्या तरीदेखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर अनेकदा टीका केली आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना भावी वाटचालीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही गायिका आहात, गृहिणी आहात, विरोधी पक्ष नेत्याची पत्नी आहात तसेच एका मोठ्या बँकेत व्हाइस प्रेसिडंट आहात. भविष्यात राजकारणात यायला, निवडणूक लढवायला आणि राज्याच्या पहिला मुख्यमंत्री बनायला तुम्हाला आवडेल का?, असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी राजकारणात रस नसल्याचे सांगितले. माझ्या मनात जे काही येते ते मी लगेच बोलते. परंतु, त्यावेळी मला मी झाशीची राणी असल्यासारखे वाटते. सगळे लोक माझ्यावर वार करत आहेत आणि मी तशीच एका जागेवर उभी आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच मला समाजसेवा करायला आवडते. पण मी ती समाजसेवा राजकारणात न येता दुसऱ्या क्षेत्रात कोणत्याही माध्यमातून करु शकते. मग ते क्षेत्र गाणे असेल किंवा इतर माध्यम असेल, असेही त्या म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- ठाकरे सरकारने 100 दिवसांत काय केलं? पहा सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 111 सेकंदात 'हा' व्हिडिओ

नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात झाले. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फडणवीस आपल्या भाषणामध्ये कमाई आणि खर्चासंदर्भात बोलत होते. त्यावेळी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे, असे वक्तव्य केले होते. यावरूनही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजींनी जे वक्तव्य केले आहे ते खरे आहे. देवेंद्रजी नेहमी खरे बोलतात. हो माझी आता तरी त्यांच्यापेक्षा टेकहोम सॅलरी जास्त आहे. माझा पगार जास्त असल्याचा त्यांना अभिमान वाटतो याचा मला गर्व आहे. पत्नीचा पगार आपल्यापेक्षा जास्त असल्याचे त्यांना वाईट वाटत नाही. पुरुषांमध्ये जो इगो असतो तो देवेंद्रजींमध्ये नाहीय याचा मला आनंद आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.