Navneet Kaur Rana (Photo Credit: Twitter)

Navneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Amravati MP Navneet Rana) उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर नागपुरमधील वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

नवनीत राणा यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (हेही वाचा - Lonavala Tourist: 15 ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात येऊ नये; पोलिसांकडून पर्यटकांना आवाहन)

दरम्यान, आज पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. एकाच कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.