मुंबई-अमरावती- मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक | X@DevendraFadnavis

महाराष्ट्रामध्ये आता मुंबई-अमरावती (Mumbai-Amravati)  प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. आज बहुप्रतिक्षित मुंबई-अमरावती-मुंबई (Mumbai-Amravati-Mumbai)  विमानसेवेचं उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे विदर्भात जाणार्‍यांना अजून एक सुलभ आणि वेगवान प्रवास सेवेचा पर्याय मिळाला आहे. अमरावती विमानतळावर आजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या विमानतळ आणि विमानसेवेचं लोकार्पण झालं आहे. 18 एप्रिलपासून प्रवासी नियमित प्रवास करू शकणार आहेत.

मुंबई-अमरावती- मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक

मुंबई-अमरावती- मुंबई सेवा आठवड्यातून तीन दिवस मिळणार आहे. यामध्ये दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा चालवली जाणार आहे. यामध्ये अलायन्स एअर कंपनी चं विमान मुंबई-अमरावती विमान सेवा दुपारी 2.30 वाजता निघेल आणि 4.15 ला पोहचेल. तर अमरावती वरून विमान 4.40 ला निघेल आणि मुंबई मध्ये 6.25 ला पोहचेल. अद्याप या विमानतळावर नाईट लॅन्डिंगची परवानगी देण्यात आलेली नाही.

शानदार वॉटर कॅनन सलामी

रवी राणा यांनी भविष्यात अमरावती वरून दिल्ली आणि पुणे साठीही विमानसेवा सुरू केली जाईल असे म्हटलं आहे. (हेही वाचा: Gautam Adani यांनी दिली Navi Mumbai Airport ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज).

आज लोकार्पणाच्या दिवशी 72 आसानी विमान अमरावती विमानतळावर लॅन्डिग़ झाले आहे. या विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी सोहळ्याला केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नवनीत राणा उपस्थित होत्या.