ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि मुंब्रा भागात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता प्रशासनाकडून या भागात संचारबंदी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कळवा भागात मेडिकल स्टोअर्स वगळता दूध, किराणा माल, भाजीपाला यांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील निर्णय होईपर्यंत ही कडक पावलं उचलली जाणार आहे. दरम्यान कळवा आणि मुंब्रा प्रभाग संपूर्णत: लॅाकडाऊन करण्याबाबत स्थानिक नगरसेवक आणि पोलिसांशी समन्वय साधून निर्णय घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. परंतू पर्यायी सोय म्हणून घरपोच काही वस्तूंची डिलिव्हरी दिली जाणार आहे. दरम्यान काल त्यांनी स्थानिक स्थितीचा आढावा घेतला आहे. ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा भागातील परिस्थितीवर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.
कळवा, मुंब्रा परिसरामध्ये 22 पैकी 12 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचं वारंवार आवाहन केलं जात होतं मात्र नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं पाहून प्रशासनाने आता कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. ठाण्याप्रमाणेच कल्याण, डोंबिवली परिसरामध्येही आता अशाप्रकारे कडक नियम लावले जाणार आहेत. सध्या भारतामध्ये 14 एप्रिलपर्यंत कोरोना व्हायारसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे.Lockdown: कल्याण- डोंबिवलीत उद्यापासून भाजीपाला, किराणा दुकानांसह डेअरीही राहणार बंद; पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश.
वर्तकनगर प्रभाग समिती मध्ये घरपोच वितरण करणार्या दुकानांची यादी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात प्रमुख ठिकाणी नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.
वर्तकनगर प्रभाग समिती मध्ये घरपोच वितरण करणार्या दुकानांची यादी: pic.twitter.com/rjxqYKiZ4F
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) April 7, 2020
मुंब्रा प्रभाग समिती मध्ये घरपोच वितरण करणार्या दुकानांची यादी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात प्रमुख ठिकाणी नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.
मुंब्रा प्रभाग समिती मध्ये घरपोच वितरण करणार्या दुकानांची यादी: pic.twitter.com/35Vd1hZkU4
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) April 7, 2020
ठाणे जिल्ह्यात एकून 85 कोरोनाबाधित असून त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 868 पर्यंत पोहचला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची स्थिती पाहून 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल केला जाणार का? याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.