महाराष्ट्रात (Maharashra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यातच मुंबईत कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतल्यानंतर 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची (Maharashra Bachao) घोषणा केली. फडणवीस यांच्या या घोषणेला एक तासही होत नाही तोच अहमदनगर येथे भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाखाली 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन केले. महाराष्ट्रात आणि मुंबई शहरात कोरोना विषाणूचे संकट गडद होताना दिसत आहे. यावरूनच राज्य सरकार निष्क्रिय झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात कोरोना विषाणूचे संकट असताना राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. महाविकास आघाडीला कोरोना बाबत जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे भाजपने सांगितले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने हे आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिली आहे.
कोरोनाच्या विषाणूच्या महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील करोनाचा विळखा आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राज्य सरकारकडून राज्यात कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. केंद्र सरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टीका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. माजी खासदर दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शामराव पिंपळे, विवेक नाईक, वंसत लोढा, सचिन पारखी उपस्थित होते. हे देखील वाचा- चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करणे, हीच भाजपची कार्यपद्धत- काँग्रेस
मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे महाराष्ट्रातील तरुणांना पुढे येण्याच आवाहन; पाहूयात ठळक मुद्दे - Watch Video
तर राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर होत गेली आहे. या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला सर्वतोपरी साथ देण्यासाठी भाजपाने सरकारवर टीका टाळली होती. पण दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय पक्षाने घेतला, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.