महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षात चांगलेच राजकारण पेटल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. राज्यावर कोरोनाचे संकट असताना राज्य सरकारकडून अजूनही काही ठोस पाऊले उचलले जात असल्याचे दिसत नाही. तसेच राज्यातील रुग्णालयात अनेक रुग्णांची गैरसोय होत असल्याचे या व्हिडिओच्या माध्यामातून सांगितले आहे. मात्र, हा व्हिडिओ जुना आहे, असे काँग्रेसने स्पष्टिकरण दिले आहे. चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, हीच भाजपची कार्यपद्धत आहे. राज्यावर कोरोनाचे संकटाचा सामना करण्यासाठी दमडीचीही मदत न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जुना व्हिडिओ टाकून राजकारण करताना लाज कशी वाटत नाही? असा प्रश्नही काँग्रसने आपल्या ट्विटर हॅंडल वरून विचारला आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कॉरंटाईनची सोयीसुवीधा असतील,रूग्णालय असतील,पेशंटची गैरसोय होत आहे लॉकडाऊन 4 सुरू झाले आहे. पण राज्य सरकारकडे अजूनही काही ठोस पाऊले उचलताना दिसत नाही व नियोजनाचा अभाव जाणवत असल्यामुळे सामान्य जनता व कोरोना वॉरियर्स सुद्धा त्रस्त झाले आहे, अशा आशायाचे ट्विट महाराष्ट्र भाजपने सोमवारी केले होते. मात्र, ही माहिती जुनी असून भाजप नेते नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद
कॉंग्रेसचे ट्वीट-
फेक न्यूज पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे ही @BJP4Maharashtra ची कार्यपद्धतीच आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी दमडीचीही मदत न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जुने व्हिडीयो टाकून राजकारण करताना लाज कशी वाटत नाही? #ShameOnYouBJP https://t.co/EjAkYCk8XF
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 19, 2020
भाजपला कायम खोटेपणा दिसून यतो. आधी सुरुवातीला काही झाले असेल, पण आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. देशात जेवढे काम होत नाही, तेवढे आता राज्य सरकार करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने सर्व सांगितले आहे. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे, असे महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.