विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेवर भर देण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होणार बदल
Pune University (Photo Credits: Wiki Commons)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्व शाखांचा अभ्यासक्रम यावर्षीपासून बदलण्यात निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेवर भर देण्याचा उद्देशाने हा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभ्यासक्रम बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच विद्यापीठांच्या संबंधित अधिका-यांची बैठक घेऊन ह्या अभ्यासक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. सर्वप्रथम पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम बदलता येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. त्याचबरोबर बाजारपेठ आणि औद्योगिक क्षेत्राशी जुळवून घेण्यासंबंधीचीही माहिती मिळेल.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी Online Documents Attestation ची नवी सुविधा; पहा कसा घ्याल लाभ

याआधीही विद्यापीठांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या होत्या. मात्र तरीही अभ्यासक्रमात बदल केले जात नव्हते. त्याचाच परिणाम म्हणून की काय विद्यार्थी पदवीधर असूनही बेरोजगार राहत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे एकूणच या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत पुणे विद्यापीठाने सर्व शाखांचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.