श्री स्वामी समर्थ (Swami Samarth) भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अक्कलकोट (Akkalkot) येथील श्री स्वामी समर्थ मंदिर 25 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2020 जानेवारी पर्यंत बंद (Akkalkot Swami Samarth Temple Closed for Devotees) ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारने कोरोना व्हायरस संकट काळात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होऊ नये. तसेच, नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी करु नये. त्यातून कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
वर्षाखेर आणि नववर्ष या काळात सलग सुट्टी सलग तीन दिवस जोडून आली आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटक अक्कलकोट मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे मंदिर 25 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2020 पर्यंत बंद असेल.
प्राप्त माहितीनुसार, अक्कलको मंदिर 24 डिसेंबरच्या रात्रीपासूनच बंद करण्यात आले आहे. नाताळ आणि नववर्ष अशा सुट्ट्या सलग जोडून आल्याने पर्यटक मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करु शकतात याची जाणीव मंदिर प्रशासनाला होती. कोरोना काळ नसताना या आधिच्या वर्षांचा अनुभव पाहता मोठ्या प्रमाणावर भाविक अक्कलकोटला येत असतात. (हेही वाचा, स्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!)
दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. तसेच, पर्यटन स्थाळांवरही नागिरकांनी मोठी गर्दी केलीआहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर, कोल्हापूर यासांरख्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. शिवाय शिर्डी, अक्कलकोट अशा धार्मिक स्थळांवरही भक्तगण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.