अजोय मेहता महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव
Ajoy Mehta | (फोटो सौजन्य-ANI)

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता (Ajoy Mehta) यांना  बढती मिळून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र मुख्य सचिव (Maharashtra Chief Secretary) पदावर झाली आहे. शुक्रवार (10 एप्रिल) दुपारनंतर त्यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत आदेश मिळाल्यानंतर ते पदाचा कार्यभार स्वीकारतील.

दरम्यान, अजोय मेहता यांच्या संभाव्य नियुक्तीबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तातही अजोय मेहता यांना राज्याच्या मुख्य सचिव पदावर नियुक्त केले जाणार असल्याचे म्हटले आहे. सध्यस्थितीत लोकसभा निवडणूक अचारसंहिता लागू आहे. त्यातच राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी गेले काही दिवस सरकार नवा चेहरा शोधत होते. अखेर अजोय मेहता याच्या रुपात हा चेहरा सरकारला मिळाल्याचे समजते. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून मेहतांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते आहे. (हेही वाचा, रजनीकांत मिश्रा यांची CBI संचालक पदी नियुक्ती?)

प्राप्त माहितीनुसार, अजोय मेहता हे 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. निवृत्तीपर्यंत ते जर पदावर कायम राहिले असते तर, मेहता यांना हे पद मिळू शकले नसते, अशीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त म्हणून मेहता यांच्यानंतर रिक्त होणाऱ्या पदावर कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांच्या हवाल्याने सांगायचे तर, विद्यमानअतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे आयुक्तपदाच्या मुख्य शर्यतीत असल्याची चर्चा आहे.