पुणे स्मार्ट सिटी वॉर रुमला अजित पवार यांची भेट; म्हणाले, कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
अजित पवार (PC - Twitter)

कोरोना विषाणूला (Coronavrius) नियंत्रणात आणण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिली आहे. अजित पवार यांनी आज पुणे स्मार्ट सिटी वॉर रुमला (Pune Smart City War Room) भेट दिली आहे. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूसंबंधित उपाययोजनांची माहिती देणाऱ्या डॅशबोर्ड प्रणालीची माहिती जाणून घेतली. तसेच कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी वैद्यकिय यंत्रणांना केलं.

मुंबई तसेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्य सरकार विरोधात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकार कोरोना विषाणूचं संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस तसेच इतर भाजप नेत्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज कोरोना विषाणुला नियंत्रणात आणण्यासाठी पुण्यातील वैद्यकिय यंत्रणांना युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशा सुचना दिल्या आहे. तसेच कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली आहे. (हेही वाचा - 'कोरोना को भूल गए, राजकारण प्यारा है,' लहान मुलांचा फोटो शेअर करत आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका)

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टया, दाट लोकवस्ती तसेच इतर सर्व आव्हानांवर मात करुन आपल्याला कोरोना विरोधातील लढाई जिंकायची आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना आव्हानांचा यशस्वी सामना करत आहे. मात्र, असे असताना भाजपने ‘काळे झेंडे’ दाखवून आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योध्दांचा अपमान करुन नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं भाजपला केलं होतं.