राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या रजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला असून, शरद पवार यांनी केलेला 'पॉवर गेम' फळाला आल्याचे बोललो जात आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिंडळ गटनेते जयंत पाटील यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या कथीत राजीनामानाट्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे. अजित पवार यांनी परत यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवार कुटुंबीयांनी निकराचे प्रयत्न सुरु केले होते. हे प्रयत्न पुन्हा एकदा फळाला आल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, हायव्होल्टेज बैठक; अजित पवार यांचे पुन्हा 'कहो दिल से राष्ट्रवादी फिर से'?; दादा परत फिरा! कुटुंबीयांकडून दबाव वाढला)
एएनआय ट्विट
Sources: Ajit Pawar resigns as the Deputy Chief Minister of #Maharashtra. pic.twitter.com/S8KcDQ6MQV
— ANI (@ANI) November 26, 2019
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यात फडणवीस काय घोषणा करतात याबाबत उत्सुकता आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे संख्याबळ जमत नसल्याने देवेंद्र फडणवीसही राजीनामा देण्याची शक्यात राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.