Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

Ajit Pawar On Shiv Sena:  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून विरोधकांकडून त्यांच्या गठबंधनाबद्दल वारंवार टीका केली जात आहे. तर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे ही बोलले गेले. मात्र यावर स्पष्टीकरण ही महाविकास आघाडी सरकारकडून दिले गेले. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना पक्षा संदर्भात एक मोठे विधान केले आहे. अजित पवार यांनी असे म्हटले की, शिवसेनेसोबत कायमचे रहायचे असल्याचे कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबच जुळवून घ्यावे.(Sanjay Raut Criticized BJP: टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा - संजय राऊत)

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकी वेळीच अजित पवार यांनी आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणूकांच्या मुद्द्यांसह शिवसेना पक्षासोबत स्थानिक पातळीवर जुळून घ्यावे लागेल असे ही पदाधिकाऱ्यांना म्हटले आहे. या बैठकीला राज्य मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीचे अनेक मंत्री, पक्षाचे जेष्ठ नेते आणि 2019 ची विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार यांनी उपस्थिती लावली होती.(Governor Quota MLC Maharashtra: महाविकासआघाडी सरकारने राज्यपालांना शिफारस केलेल्या एकनाथ खडसे , राजू शेट्टी यांच्यासह आठ नावांना आक्षेप; कोर्टात याचिका दाखल)

Tweet:

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून तयारी सुरु झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील वर्ष हे निवडणूकीचे असणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसारच  शिवसेना नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी आता पक्षाकडून करण्यास सुरुवात झाली आहे.