Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

पुणे येथील कोविड सेंटर (Pune Jumbo COVID Center) कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमय्या यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर (Jumbo COVID Centre) कंत्राटात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. त्या कंत्राटामध्ये कोणत्याही प्रकारचे काहीही गैर घडले नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्यात सीओपी मैदान आणि आणखी एक, दोन ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले. जम्बो कोविड हॉस्पीटलचे काम राज्य सरकार आणि जिल्हा वारषिक योजना आणि पालिका अशा तीन घटकांनी मिळून केलेले असते. या कामात केवळ राज्य सरकारच नव्हे तर पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार, पीसीएमसी कमिशनर राजेश पाटील, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए कमिश्नर सुहास दिवसे आणि सीईओ जिल्हा परिषद आदींचाही समावेश होता. आज जी एक मिटींग झाली त्यात हाच विषय आम्ही पहिल्यांदा घेतला होता. कोविडमध्ये झालेल्या कामाबाबत आम्ही एक नोट तयार करण्यास सांगितले आहे. ही नोट लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. (हेही वाचा, Aaditya Thackeray यांच्यासह उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा वरळी ते शिवाजी पार्क परिसरात अडीज तासांचा पाहणी दौरा; राजकीय वर्तुळात चर्चा)

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी जम्बो कोविड सेंटर च्या कामाकासाठी 100 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. हे कंत्राट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन त्यांच्या निकटवर्तीयांना दिले आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. लवकरच आम्ही त्याची पोलखोल करणार आहोत, असेही सोमय्या यांनी म्हटले आहेत.