मुंबई मध्ये आज सकाळी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहीम, वरळी, धोबी घाट, शिवाजी पार्क परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला. सकाळी 7-8 च्या सुमारास दोघेही बाहेर पडले होते. हा खाजगी दौरा असल्याचं अजित पवारांनी नंतर मीडीयाशी बोलताना सांगितले. दरम्यान या दौर्यामध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांनी अजित पवारांचं सारथ्य केले आहे.
अजित पवार यांनी सीएसआर आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईत मागील काही महिन्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आहे. यावेळी शिवाजी पार्क परिसरामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या व्हुविंग डेकचादेखील त्यांनी आढावा घेतला. या व्ह्युविंग डेक वरून वांद्रे-वरळी सी लिंकचा नजारा पाहता येणार आहे. अजित पवार यांनी पाहणी केलेला भाग हा आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ देखील आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai: दादर येथील Chaitya Bhoomi Viewing Deck चे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video).
अजित पवार ट्वीट
राज्याचे पर्यावरण मंत्री @AUThackeray यांच्यासह दादर येथील चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांची आज पाहणी केली. pic.twitter.com/2QwqjCXrQD
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2022
आदित्य ठाकरेंचं सारथ्य
View this post on Instagram
आदित्य ठाकरे आणि अजित पवारांचा हा पाहणी दौरा सध्या चर्चेमध्ये आहे. येत्या काही महिन्यातच मुंबई मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. शिवसेनेकडून ही निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढली जाणार आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युती करणार का? याची चर्चा देखील रंगायला सुरूवात झाली आहे.
एका मुलाखती मध्ये शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 125 जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे. या निवडणुकीत शिवसेना 150 जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण किमान 125 जागा मिळतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.