'अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आले आहे' संजय राऊत यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Sanjay Raut (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसह (BJP) हात मिळवणी केल्यानंतर महाराष्ट्राचे (Maharshtra) राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अयोग्य असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेसमोर नवा प्रश्न उभा केला आहे. अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आले असून ते लवकरच पक्षात परतणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर देखील दिले आहे.

महाराष्ट्राचे राजकारण अधिकच पेटताना दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असे वातावरण निर्माण झाले होते. यातच आज सकाळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यानी नाराजी व्यक्त करत मुंबईतील व्हाय. बी. चव्हान सभागृहाबाहेर अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देखील दिल्या आहेत. परंतु, अजित पवार यांच्यासारखा नेता पक्ष आणि कुटुंब सोडून कधीच जाऊ शकत नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णय त्यांचा नसून त्यांना ब्लॅकमेक करण्यात आले आहे. , असे वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. हे देखील वाचा- अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा पाठिंबा? राजकीय चर्चांना उधाण

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना पक्षाचे नुकसान झाले आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर संजय राऊत यांनी आक्रमक भुमिका घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे 35 आमदार शिवसेनेचा संपर्कात आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.