Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ajit Pawar Elected as NCP Group Leader: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर(Maharashtra Politics) राज्यात महायुतीचे सरकार येणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा (MVA)पराभव झाला. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूकीतला  विजय उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी (Ajit Pawar)नक्कीच चांगला ठरला आहे.

महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर आघाडी मिळाली आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवारांनी एका मोठ्या पदावर वर्णी लागली आहे. (Ajit Pawar Next CM Poster: भावी मुख्यमंत्री अजित पवार! पुण्यापाठोपाठ मुंबईतील मलबार हिल परिसरात झळकले पोस्टर (Watch Video))

देवगिरी बंगल्यावर बैठका

देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थितीत होते. यावेळी सर्व आमदारांनी एकमताने अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड केली. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांंनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनरही लागले आहेत. मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगितले आहे.

शिंदे गटाचा गटनेता ठरणार?

दरम्यान महायुतीमध्ये भाजपचे 132 तर शिवसेनेचे 57 आमदार विजयी झाले आहेत. तर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले आहेत. यानंतर आज अजित पवार यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवले आहे. सध्या या हॉटेलमध्ये साधारण 30 ते 35 आमदार उपस्थितीत आहे. अनेक आमदार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. ग्रामीण भागातील आमदारांना पोहोचायला वेळ लागत आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत सर्व आमदार आल्यानंतर शिंदे गटाची बैठक होईल. या बैठकीत गटनेता निवडण्यात येईल.