मुंबई पाठोपाठ पुण्यातही नाईटलाईफ सुरु होणार? अजित पवार यांनी दिले हे उत्तर
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

नवनिर्वाचीत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील काही ठिकाणी 26 जानेवारीपासून नाईट लाईफ (Night Life) सुरू करणार असल्याची घोषणा केली. तेव्हापासूनच अनेक ठिकलांहून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोबतच आता मुंबई पाठोपाठ पुणे शहरातून सुद्धा अशा सुविधा उपलब्ध करणार अशा चर्चांना देखील उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी या चर्चांवर उत्तर देताना आदित्य यांनी स्वतः सुद्धा जर का पुणे किंवा पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)  मधून प्रस्ताव आला, तर नक्कीच विचार करू, असे सांगितले होते. आता या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी  उत्तर दिले आहे. “मुंबईच जीवन वेगळं असून 24 तास मुंबई जागीच असते. मात्र आपण पुणेकर आहोत. पुणेकरांना मान्य होईल का हे पाहून मग निर्णय घेण्याचा विचार करू,” असं अजित पवार यांनी म्हंटल आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार उरो रुग्णालयात आले असता त्यांना हा प्रश्न करण्यात आला होता..आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी, "मुंबई कधी झोपत नाही, २४ तास जागी असते. सुरुवातीला या निर्णयाचे काय पडसाद उमटतात ते पाहून मग आपणही विचार करू, असे सांगितले. तसेच, लगेच इकडं सुरू झालं की इकडे सुरू करा, याला अर्थ नाही आपण पुणेकर आहोत, पुणेकरांचे वेगळं मत असू शकत. इथल्या एनजीओचं वेगळं मत असू शकतं. त्याच्यामुळे पुणेकरांना मान्य होईल, अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल. यामध्ये पूर्णपणे करणार किंवा करणारच नाही असा मी म्हणत नाही. असे म्हणत पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये सुद्धा 26 जानेवारीपासून हा नाईट लाइफ सुरु करण्याचा प्रस्ताव अद्याप निश्चित झालेला दिसत नाहीये, आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयाबद्दल बोलताना यामुळे पोलीस प्रशासनावर तणाव येईल असे म्हणत बुधवारच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळेच आधी मुंबईत तरी हा निर्णय लागू होतो का आणि मग हेच वारे पूणयपर्यंत पोहचतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.